okaka

okaka

Sunday, October 17, 2010

OKAKA


ओकाका

लहानपणीच्या आठवणी... झाडावर चढून चोरुन आंबा खाणं, विहिरीतलं डुंबणं, कट्ट्यावर बसुन मित्रांबरोबर गप्पा मारणं... आणि हो मराठमोळ्या शिव्या देणं, कुठंतरी हरवलंय. सगळं कुठंतरी धुसर होत चाललंय आणि काही वर्षात नामषेशही होईल. छोट्या गोष्टींतला हा आनंद आपल्या धकाधकीच्या जीवनात हरवलाय. म्हणुनच "खास महाराष्ट्रीयन थाळी" असं म्हटलं तर आपल्याच लोकांच्या सर्वात जास्त उड्या पडतात.
कुठं गेलं ते ज्वारी - गहु मोजायचं 'चिपटं - मापटं'? कुठं आहेत त्या रॉकेलच्या 'चिमण्या'? कुठं आहे ते दगडी जातं? आणि कुठं आहेत त्या अवजड 'ट्रंका'?
शहरी वातावरणाला भुललेलो आपण ह्या छोट्या गोष्टी हरवुन बसलोय. अशाच कित्त्येक गोष्टी आता 'शेवटचा श्वास' घेत आहेत. त्यांना पुनरुज्जीवन देण्याची ही धडपड.
'राकट देशा कणखर देशा, फुलांच्याही देशा' असा हा आपला महाराष्ट्र आणि तशीच आपली संस्कृतीही. तिची ही चाललेली पडझड आणि पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण ह्यातुन एक मराठी भावना जगवायची आणि मराठी बाणा अंगी बाळगवयचा हा छोटासा प्रयत्न...
महाराष्ट्राच्या मातीस, तिच्या शुरवीरांस आणि संस्कृतीस हा खारीच्या वाटा अर्पण....