okaka

okaka

Monday, November 1, 2010

उत्पादने

टी-शर्ट्
अंग तर झाकायचंच पण अभिमानानं आणि ताठ मानेनंही मिरवायचं!
म्हणूनच हे मराठी बाण्याची रांगडी प्रिंट्स.
T-shirts
T-shirts
T-shirts
T-shirts
T-shirts
कोस्टर
चहा/ कॉफीचा आस्वाद घेताना ती सांडू नये म्हणून कप टेकवायची जागा.
खास स्टीलची प्लेट आणि हीट ट्रीटमेंट केलेल्या प्रिंट्स.
किं. रु. १७५/ सेट
Coaster
बॅजेस
"हे बघ, माझ्याकडे काय आहे!" म्हणून बॅगला लावुन मिरवायची गोष्ट.
शा़ळेत जाणार्‍यांसाठी खास भेट!
किं.रु. २०.
Badges
मग
आपला मग दुसर्‍या कुणी घेवू नये म्हणुन केलेले खास पर्सनलाईज्ड मग्ज.
किं. रु. १७५.
Cup
इतरही बरंच काही येत आहे तुमच्या भेटीला.. आणि हो, आवडलं तर घ्या आणि बिनधास्त वापरा!
आमची उत्पादने तुम्हाला घरपोच मिळतील.
आमच्या दुकानाचा शुभारंभ लवकरच होत आहे!

विदुषी

विदुषी

ह्या विदुषी म्हणजे काही वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या मराठमोळ्या व्यक्तिरेखा. अगदी सर्वसामान्य आणि आपल्यातल्याच. आता त्या असतील, नसतीलही, पण आठवण आल्यावर छान वाटतं... त्यांच्याच माध्यमातुन आमची काही उत्पादने तुमच्यासमोर येत आहेत.

characters-together.jpg

Sunday, October 17, 2010

OKAKA


ओकाका

लहानपणीच्या आठवणी... झाडावर चढून चोरुन आंबा खाणं, विहिरीतलं डुंबणं, कट्ट्यावर बसुन मित्रांबरोबर गप्पा मारणं... आणि हो मराठमोळ्या शिव्या देणं, कुठंतरी हरवलंय. सगळं कुठंतरी धुसर होत चाललंय आणि काही वर्षात नामषेशही होईल. छोट्या गोष्टींतला हा आनंद आपल्या धकाधकीच्या जीवनात हरवलाय. म्हणुनच "खास महाराष्ट्रीयन थाळी" असं म्हटलं तर आपल्याच लोकांच्या सर्वात जास्त उड्या पडतात.
कुठं गेलं ते ज्वारी - गहु मोजायचं 'चिपटं - मापटं'? कुठं आहेत त्या रॉकेलच्या 'चिमण्या'? कुठं आहे ते दगडी जातं? आणि कुठं आहेत त्या अवजड 'ट्रंका'?
शहरी वातावरणाला भुललेलो आपण ह्या छोट्या गोष्टी हरवुन बसलोय. अशाच कित्त्येक गोष्टी आता 'शेवटचा श्वास' घेत आहेत. त्यांना पुनरुज्जीवन देण्याची ही धडपड.
'राकट देशा कणखर देशा, फुलांच्याही देशा' असा हा आपला महाराष्ट्र आणि तशीच आपली संस्कृतीही. तिची ही चाललेली पडझड आणि पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण ह्यातुन एक मराठी भावना जगवायची आणि मराठी बाणा अंगी बाळगवयचा हा छोटासा प्रयत्न...
महाराष्ट्राच्या मातीस, तिच्या शुरवीरांस आणि संस्कृतीस हा खारीच्या वाटा अर्पण....